उत्तर प्रदेश- बरेलीत एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे सामूहिक बलात्कार झालेल्या या अल्पवयीन मुलीचा जातपंचायतीनं बाल विवाह लावून दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांवरही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.जातपंचायतीनं या बलात्कार पीडित मुलीचा विवाह तिस-याच एका निरपराध मुलाशी करून दिला असून, बलात्कार करणारे आरोपी त्या पीडितेला ठार मारण्याची धमकी देत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. बरेलीतल्या शाही ठाणे परिसरात हा प्रकार घडला आहे.एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या गावातल्याच तीन नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर ते नराधम बलात्कार पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी देऊ लागले. जातपंचायतीकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी पंचायत बोलावून अन्य एका निरपराध अल्पवयीन मुलाशी त्या पीडितेचं लग्न लावून दिलं. सामूहिक बलात्कार करूनही त्या नराधमांनी बलात्कार पीडितेशी लग्न केलेल्या निरपराध मुलालाही त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिसांशी साटेलोटं करून त्या निरपराध मुलाला पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांविरोधात एफआयआर दाखल करून घेतलं आहे. परंतु अद्यापही त्या नराधम आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही.
14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, जातपंचायतीनं करून दिला बाल विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 16:43 IST