समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 20:37 IST2023-10-02T20:36:02+5:302023-10-02T20:37:16+5:30

13 वर्षीय मुलाला समुद्राने गिळले; गणपतीच्या मूर्तीने दिला आधार

13-year-old-boy-drowned-in-the-sea-kept-swimming-for-24-hours-with-the-help-of-ganesh-idol-Found-alive-in-surat | समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण

समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण

Surat Ganesh Visarjan News: गेल्या महिन्यात 29 सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या दिवशी देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. पण, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गुजरातच्या सूरतमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुरत शहरातील डुम्मस बीचवर कुटुंबासह फिरायला गेलेला एक 13 वर्षीय मुलगा समुद्राच्या लाटांसह वाहून गेला. 

अखेर मुलगा जिवंत सापडला
समुद्रकिनारी उभे त्याचे कुटुंबीय इच्छा असूनही त्याला मदत करू शकले नाहीत. मुलाच्या शोधासाठी सुरत पोलीस प्रशासनाने पाणबुडे आणि अग्निशमन दलाची मदत घेतली होती. अनेकवेळ शोधूनही त्या मुलाचा शोध लागला नाही. मुलाचा शोध न लागल्याने दुखी होऊन कुटुंबीय घरी परतले. पण, दुसऱ्या दिवशी एक चमत्कार घडला. समुद्रात हरवलेला मुलगा जिवंत असल्याचे समजले. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण या मुलाच्या घटनेत एकदम तंतोतंत बसते.

गणरायाने वाचवले मुलाचे प्राण
मिळालेल्या माहितीनुसार, लाटांसह खोल समुद्रात वाहून गेलेल्या मुलाला गणपतीच्या मूर्तीचा आधार मिळाला. गणपतीची मूर्ती पाण्यावर तरंगत होती, मुलगाही 24 तासांपेक्षा जास्त काळ मूर्तीला घट्ट पकडून बसला. दुसऱ्या दिवशी समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या भवानी बट येथील मच्छीमाराना मुलगा दिसला. त्यांनी त्या मुलाला बोटीवर घेऊन किनाऱ्यावर आणले आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. 

मुलाला गणेशमूर्तीचा आधार मिळाला नसता, तर कदाचित 13 वर्षीय लखन देवीपूजक जिवंत राहिला नसता. तिकडे मुलगा जिवंत असल्याची बातमी कानावर पडताच कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. मुलगा जिवंत असल्याची आशा सोडलेल्या कुटुंबासाठी ही बातमी चमत्कारापेक्षा कमी नव्हती. सध्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: 13-year-old-boy-drowned-in-the-sea-kept-swimming-for-24-hours-with-the-help-of-ganesh-idol-Found-alive-in-surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.