शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील प्रेमाच्या भानगडीत झाली 13 लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 16:32 IST

सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रेमप्रकरणांमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही फेसबूकवरील प्रेमप्रकरणामधून...

बंगळुरू - सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रेमप्रकरणांमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही फेसबूकवरील प्रेमप्रकरणामधून अशाच प्रकारास सामोरे जावे लागले आहे. फेसबूकवर एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही दिवसांनंतर सदर तरुणीने आपल्या आईच्या उपचारासाठी 13 लाख रुपयांची मागणी केली. या इंजिनियरने तिला पैसेही दिले मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.याबाबत सविस्तक हकीकत अशी, गदग जिल्ह्यातील हुल्लुरू गावातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाकडून आईच्या उपचारांसाठी पैसे उकळून त्याची 13 लाखांची फसवणूक केली. यासंदर्भात सदर तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरू येथे राहणाऱ्या राधा कुलकर्णी नामक महिलेने फेसबूकवर झालेल्या ओळखीनंतर आपली फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. "राधा हिने श्वेता कुलकर्णी या नावाने फेसबूकवर अकाउंट बनवले होते. त्यानंतर तिने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आम्ही रोज ऑनलाइन चॅटिंग करू लागलो. काही दिवसांतच आपली तिच्याशी मैत्री झाली.  मग या महिलेने आपणास प्रपोझ केले आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास बसला, अशी माहिती पीडित तरुणाने दिली आहे. पुढे या महिलेने आपल्या आईच्या उपचारासाठी पीडित तरुणाकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर सदर तरुणाने डिसेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 दरम्यान, तिच्या बँक खात्यात 13 लाख रुपये जमा केले. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे सदर तरुणाच्या ध्यानात आले. त्याने पैशांची मागणी केली असता सदर महिलेने टाळाटाळ सुरू केली. अखेरीस या तरुणाने पोलिसांत धाव घेऊन महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.   

टॅग्स :Crimeगुन्हाFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया