12th student who inspired by Modi build unique Sports car | मोदींपासून प्रेरणा घेत 12 वीच्या विद्यार्थ्याने बनविली स्पोर्ट्स कार; फिचर्सही आहेत भन्नाट
मोदींपासून प्रेरणा घेत 12 वीच्या विद्यार्थ्याने बनविली स्पोर्ट्स कार; फिचर्सही आहेत भन्नाट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी परकीय चलन आणि पर्यावरणाचे रक्षणाचा विचार करत आहेत. यामुळे गेल्या 2 वर्षांपासून इलेक्ट्रीक कारच्या वापर आणि उत्पादनासाठी प्रयत्न करत आहेत. मोदींच्या याच गोष्टीवरून प्रेरित होऊन एका 12 वीच्या विद्यार्थ्याने अशी स्पोर्ट कार बनविली जी विजेवर चालणार आहे. 


कौशल या विद्यार्थ्याने ही जगातील सर्वात स्वस्त स्पोर्ट कार असल्याचा दावा केला आहे. अशा प्रकारच्या कारची किंमत एक कोटींच्या आसपास असते. तर कौशलला ही कार बनविण्यासाठी 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च आला आहे. मोठी बाब म्हणजे या कारचे इंजिन विजेवर चालण्यासाठी सक्षम आहे. तर अन्य इलेक्ट्रीक कारसाठी वेगळी मोटर बसवावी लागते. 

कौशलला यासाठी एनसीआरटीसीतर्फे आयोजित झालेल्या विज्ञान प्रदर्शनात पहिला पुरस्कार मिळाला होता. उत्तर प्रदेशमध्ये एटामध्ये कौशलचे वडील शेती करतात. मात्र, पैसे नसल्याने कौशलला ते पुढे शिकवू शकत नव्हते. यामुळे कौशलची हुशारी पाहून एमिटी विश्वविद्यालयाने कौशलला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बीटेकला प्रवेश दिला आहे. कौशल आता या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास जाणार आहे. 


दहावीत असताना बनविलेला मिनी बुलडोझर
कौसल दिल्लीमध्ये एका साध्या शाळेत शिकत होता. त्याच्यामध्ये वाहनांसंबंधी लहानपणापासूनच आकर्षण होते. इंटरनेट आणि मित्रांना विचारत त्याने वाहनांचा अभ्यास सुरू केला होता. 10 वी मध्ये असताना त्याने मिनी बुलडोझर तयार केला होता. 


स्पोर्ट कारची वैशिष्ट्ये

  • कारचे इंजिन इलेक्ट्रीक आहे.
  • ही कार 120 ते 170 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. 
  • कारमध्ये इंजिन मागील बाजुला आहे. 
  • कारचे छत पूर्णपणे उघडले जाऊ शकते. 
  • कारमध्ये पूर्णपणे स्वदेशी वस्तूंचा वापर झाला आहे. 
  • या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनही वापरता येऊ शकते. 
     

Web Title: 12th student who inspired by Modi build unique Sports car
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.