12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:49 IST2025-08-21T18:47:45+5:302025-08-21T18:49:44+5:30

High Court Recruitment 2025: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

12th Pass Job: Patna High Court Stenographer Recruitment Online Form 2025 for 111 Post | 12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पाटणा उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १११ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. आजपासून (२१ ऑगस्ट २०२५) अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्ज फक्त अधिकृत वेबसाइट patnahighcourt.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, इंग्लिश शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट किमान ८० शब्द आणि इंग्रजी टायपिंगमध्ये प्रति मिनिट ४० शब्दांचा वेग आवश्यक आहे. इंग्लिश शॉर्टहँड आणि इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट देण्यात आला. सामान्य/ईडब्ल्यूएस/बीसी/ईबीसी प्रवर्गासाठी ११०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर, एससी/एसटी/ओएच प्रवर्गासाठी ५५० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले. 

पगार

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० पर्यंत पगार मिळेल.

असा करा अर्ज

- सर्वप्रथम patnahighcourt.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर दिलेल्या 'Apply Now' लिंकवर क्लिक करा.
- पुढे नोंदणी करा आणि नंतर लॉग इन करा.
- त्यानंतर योग्य माहितीसह अर्ज भरा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
- भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा.

Web Title: 12th Pass Job: Patna High Court Stenographer Recruitment Online Form 2025 for 111 Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.