Corona Vaccine : अरे व्वा! 125 वर्षीय आजोबांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:23 PM2021-11-03T12:23:32+5:302021-11-03T12:24:08+5:30

Corona Vaccine : 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांनी कोरोना लस घेतली. त्यांनी लोकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचं देखील आवाहन केलं आहे. 

125 years old swami shivanand of varanasi get corona vaccine second dose became oldest man in country | Corona Vaccine : अरे व्वा! 125 वर्षीय आजोबांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

Corona Vaccine : अरे व्वा! 125 वर्षीय आजोबांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन कोटींवर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,903 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान 125 वर्षीय आजोबांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य देखील लोकांना सांगितलं आहे. वाराणसीमध्ये 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांनी कोरोना लस घेतली. त्यांनी लोकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचं देखील आवाहन केलं आहे. 

बाबा शिवानंद हे कोरोना लस घेणारे देशातील सर्वात जास्त वयाचे व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना लसीकरण केंद्रावर त्यांनी लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि भरपूर आयुष्य जगण्याची संधी मिळवा असं सांगितलं आहे. आरोग्य अधिकारी डॉ. सारिका राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे कोलकाता येथील असलेले स्वामी शिवानंद बाब गेल्या अनेक वर्षांपासून काशी येथे राहत आहेत. त्यांनी 9 जून रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. आरोग्य विभागाने देखील कोरोना लस घेणारे हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. 

सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीसाठी बाबांकडे आधार कार्ड मागितलं. तेव्हा ते पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला. ते शिवानंद यांच्याकडे थोडावेळ पाहतच बसले. त्यांची जन्मतारीख 8 ऑगस्ट 1896 असल्याचं समजलं. एवढं वय असताना देखील ते निरोगी असल्याचं पाहायला मिळालं. कर्मचाऱ्यांनी त्यांना दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं तेव्हा त्यांनी नियमित योगा करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच तेल-मसाला असलेल्या पदार्थांचं आपण सेवन करत नसल्याचं देखील म्हटलं आहे. त्यामुळेच शिवानंद हे उत्तम आयुष्य जगत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 125 years old swami shivanand of varanasi get corona vaccine second dose became oldest man in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.