शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

महिना अखेरीपर्यंत १२५ टोल गुंडाळणार

By admin | Updated: February 12, 2015 23:34 IST

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना चालू महिनाअखेरीपर्यंत पथकरातून काहीसा दिलासा मिळणार आहे. महामार्गांवर पथकर

नवी दिल्ली : देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना चालू महिनाअखेरीपर्यंत पथकरातून काहीसा दिलासा मिळणार आहे. महामार्गांवर पथकर भरण्यापासून दिलासा देण्यासाठी सरकारने फेब्रुवारीत देशभरातील सुमारे १२५ टोल नाके बंद करण्याचे संकेत आज दिले.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, ‘आम्ही काही महामार्गांवरील जवळपास १२५ टोल नाके चालू महिना अखेरीपर्यंत बंद करणार आहोत. जवळपास ६१ मार्गांवरील टोल संकलन अगोदरच बंद करण्यात आले आहे.’ तसेच ५० कोटींहून कमी गुंतवणुकीच्या रस्ता बांधणी योजनांना टोलमुक्त करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.गडकरी यांनी कोलकाता येथील ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात आयआयएमच्या अभ्यासाचा हवालात देत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक टोल (ई-टोल) संकलन प्रणाली लागू झाल्यास ८८००० कोटी रुपयांची बचत होण्यास मदत मिळेल. या पथकर नाक्यांवर प्रतीक्षा करण्यात वाहनचालकांना खूप कमी वेळ लागला.या अभ्यासात म्हटले की, विविध नाक्यांवर वाहन चालकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने हजारो कोटींचा चुराडा होता. सुमारे ६०,००० कोटी रुपयांची यात नासाडी होते. इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाने ८८,००० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान, महाराष्ट्र गेल्या वर्ष अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत टोलमुक्तीचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टोलमुक्ती देण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर यावरून घूमजाव केल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस सरकारवर केला जातो. (लोकमत न्यूज नेटवर्क)