शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 9:24 PM

दहशतवाद्यांचा निशाणा चुकल्यानं रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट; सुरक्षा दलांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या काकापोरामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये १२ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या दिशेनं फेकलेल्या ग्रेनेडचा निशाणा चुकला. त्यामुळे रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात १२ नागरिक जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात तातडीनं हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गेल्या सोमवारी कुलगाम जिल्ह्यातल्या पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सुदैवानं त्या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नव्हतं. त्यावेळीही दहशतवाद्यांनी डागलेल्या ग्रेनेडचा निशाणा चुकला होता. ग्रेनेड पोलीस ठाण्याच्या बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली.काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असताना सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. आज पाकिस्तानी सैन्यानं संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्ताननं पुंछ जिल्ह्यातल्या शाहपूर आणि करणी सेक्टरमध्ये गोळीबार केला. गेल्या आठवड्यात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे ५ जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे बंकर, लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले. यामध्ये पाकिस्तानचे ११ सैनिक मारले गेले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी