शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

११५ उमेदवारांवर पोलिसांचा ‘वॉच’

By admin | Updated: February 15, 2017 20:58 IST

११५ उमेदवारांवर पोलिसांचा ‘वॉच’

अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घाललेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ११५ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभुमिचे असून त्यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस रेकार्डवर ही नोंद करण्यात आली असून पोलीस विभागामार्फत या सर्व उमेदवारांकडून बंधपत्र लिहून घेतले जाणार आहे. महापालिका, जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकांची उमेदवारांकडून जय्यत तयारी सुरु आहे. या निवडणुकीत गुन्हेगार प्रवृत्तीचे अनेक उमेदवार उभे आहेत. यात काहींवर गंभीर तर काहींविरुध्द किरकोळ गुन्हे दाखल आहे. महापालिका निवडणुकीत यंदा ६२६ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ११५ उमेदवार पोलीस रेकार्डवर आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अशा उमेदवारांची यादी तयार केली आहे. निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे बंधपत्र लिहून घेतले जात आहे. ८५ टक्के उमेदवारांकडून बंधपत्र लिहून घेतल्या गेले आहे. १५ टक्के उमेदवारांकडूनही बंधपत्र लिहून घेतले जाणार आहे. या उमेदवारांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाईज्या उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत, असे गुन्हेगार पोेलीस आयुक्तांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामध्ये उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, विलास इंगोले, प्रदीप बाजड, सुरेश स्वर्गे, भारत चौधरी, अंबादास जावरे, प्रदीप दंदे, अशोक रेवस्कर, मनीष बजाज, दिनेश बुब, हरीदास शिरसाट, मडावी, आशिष गावंडे, अजय गोंडाणे, मंगेश मनोहरे, अरुण जयस्वाल, जितू ठाकुर, प्रवीण हरमकर, संतोष बंद्रे, अब्दुल वसीम, अफजल चौधरी, किरण अंबाडकर, ललीत झंजाळ, योगेश कावरे, चंदु बोंबरे यांच्यासह काही अन्य उमेदवारांचा सहभाग आहे. या उमेदवारांकडून बंधपत्र लिहून घेतले जाणार असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची सीपीसमोर पेशी होणार४हत्या, प्राणघातक हल्ले, शस्त्र बाळगणे, शांतता भंग करणे आदी प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या उमेदवारांची पेशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या समोर केली जाणार आहे. पोलीस आयुक्त या गुन्हेगार प्रवृत्तींच्या उमेदवारांना निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासंदर्भात ताकीद देणार आहे. समर्थकांचीही यादी तयार होणारविविध गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या या उमेदवारांच्या काही समर्थकांवरही गुन्हे दाखल आहेत. ते सुध्दा उमेदवारांसोबतच गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. या समर्थकांची यादी तयार करण्याचे काम सुध्दा पोलीस विभागाने हाती घेतले असून त्यांच्यावरही पोलीस वॉच ठेऊन आहेत.गुन्हेगारी पाश्वभूमिच्या ११५ उमेदवार निवडणुकीत उभे असून या सर्वांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. ज्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांना शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ताकीद दिल्या जाईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.