केंद्र सरकारी कर्मचार्यांना ११५ टक्के महागाई भत्ता
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:05+5:302015-04-04T01:55:05+5:30
मुंबई - केंद्र सरकारने कर्मचार्यांच्या महागाई भत्यामध्ये ८ टक्के वाढ केली आहे. आतापर्यंत हा भत्ता १०७ टक्के होता. आता तो ११५ टक्के असेल, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारी कर्मचार्यांना ११५ टक्के महागाई भत्ता
म ंबई - केंद्र सरकारने कर्मचार्यांच्या महागाई भत्यामध्ये ८ टक्के वाढ केली आहे. आतापर्यंत हा भत्ता १०७ टक्के होता. आता तो ११५ टक्के असेल, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे. ही वाढ रोखीने देण्यात येणार असून ती १ जानेवारी २०१५ पासून लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारी कर्मचार्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळाली की ती महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचार्यांना जशीच्या तशी लागू केली जाते. त्या प्रमाणे ही वाढ राज्य सरकारी कर्मचार्यांनाही लवकर लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता १०० टक्क्यांवरून १०७ टक्के करण्यात आला होता. ही वाढ राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना फेब्रुवारीच्या वेतनापासून लागू करण्यात आली होती. जुलै ते जानेवारी अशा सात महिन्यांची थकबाकी देण्याचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)--------------------------------