शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:30 IST

jammu kashmir cloudburst: जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या रामबन व रियासी जिल्ह्यांत ढगफुटी भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या रामबन व रियासी जिल्ह्यांत ढगफुटी भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला. जम्मू भागात अजूनही ३२ भाविक बेपत्ता आहेत. उत्तराखंडमध्येही बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने झालेल्या दुर्घटनांत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा बचाव पथके शोध घेत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये रामबन जिल्ह्यांतील गावांत ढगफुटी व भूस्खलनाच्या दोन दुर्घटनांत एकाच कुटुंबातील सात जणांसह ११ जणांचा मृत्यू झाला. या केंद्रशासित प्रदेशात १४ जूनपासून आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला असून, १४० जखमी आहेत. 

उत्तराखंडमध्येही आपत्तीउत्तराखंडमधील जिल्ह्यांत ढगफुटी व मुसळधार पावसामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांचा शोध सुरू आहे. चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, टिहरी जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशभरात...- कर्नाटकमध्ये सीमेवरील जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत, उत्तर कन्नडमध्ये शाळांना सुट्टी.- पंजाबमध्ये फिरोजपूरमध्ये आतापर्यंत ३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. सतलज नदीला पूर, १०० गावांना फटका.- बंगालमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा. जलपाईगुडी व अलीपूरद्वार जिल्ह्यांत बचाव पथके सज्ज.  पंजाबमधील पावसामुळे अनेक रेल्वे रद्द.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर