चक्रीवादळाचा ११ गावांना तडाखा ३०७ घरांचे नुकसान; ३५ लाखांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे
By Admin | Updated: June 3, 2014 00:59 IST2014-06-03T00:59:28+5:302014-06-03T00:59:28+5:30
अकोला : जिल्ह्यातील अकोला तालुक्यात ११ गावांना रविवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामध्ये ३०७ घरांचे नुकसान झाले असून, ३५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सोमवारी सादर करण्यात आला.

चक्रीवादळाचा ११ गावांना तडाखा ३०७ घरांचे नुकसान; ३५ लाखांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे
अ ोला : जिल्ह्यातील अकोला तालुक्यात ११ गावांना रविवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामध्ये ३०७ घरांचे नुकसान झाले असून, ३५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सोमवारी सादर करण्यात आला.रविवार, १ जून रोजी झालेल्या चक्रीवादळात अकोला तालुक्यातल्या दहीहांडा आणि घुसर महसूल मंडळांतर्गत ११ गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सोमवारी अकोला तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार ११ गावांमध्ये १० घरांचे पूर्णत: आणि २९७ घरांचे अंशत: नुकसान झाले. एकूण ३०७ घरांच्या नुकसानीसह ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये दहीहांडा येथे एक जण जखमी झाला असून, २८ घरांचे अंशत: नुकसान झाले. गणोरी येथे ८, ब्रापुरी येथे ४, वडद खुर्द येथे ५ घरांचे अंशत: नुकसान झाले. तसेच दोनवाडा येथे एका घराचे पूर्णत: आणि ४१ घरांचे अंशत: नुकसान झाले, तर काटी येथे ८ घरांचे अंशत: आणि पाटी येथे ७ घरांचे पूर्णत: व ९१ घरांचे अंशत: नुकसान झाले. हिंगणी येथे ५, खानापूर १, रोहणा १२ घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एकलारा येथे २ घरांचे पूर्णत: व ९४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. या गावांमध्ये एकूण ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अकोला तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.बॉक्स..............................३०७ घरांचे असे झाले नुकसान!पूर्णत: - १०अंशत: -२९७...........................एकूण - ३०७कोट........................... चक्रीवादळामुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला आहे. नुकसान झालेल्या घरांचे मूल्यांकन करून, मदत तातडीने वाटप करण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान तातडीने वाटप करण्यात येईल.-दिनेश गीतेतहसीलदार, अकोला