शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने एका दिवसात केली १०१ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:57 IST

शुक्रवारी दिवसभरात दोन स्वतंत्र कारवायांच्या माध्यमातून १०१ कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली

मुंबई : आर्थिक घोटाळा करणाऱ्या कंपन्यांवरील कारवाईची मोहीम सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अधिक तीव्र केली असून, शुक्रवारी दिवसभरात दोन स्वतंत्र कारवायांच्या माध्यमातून १०१ कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. ही दोन्ही प्रकरणे मनी लाँड्रिंगची आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार झारखंडमधील साहिबगंज जंगलात सुरू असलेल्या अवैध खाण प्रकल्पावर ईडीने छापे टाकले. हा प्रकल्प झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा निकटवर्तीय असलेल्या पंकज मिश्राचा असल्याचे समजते. या जंगल परिसरात कंपनीशी संबंधित नऊ ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत पाच स्टोन क्रशर मशीन आणि सुरुंगासाठी लागणारे काही सामान जप्त केले. 

या दोन्ही सामुग्रीसाठी कंपनीकडे कोणतीही परवानगी नव्हती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच या छाप्यात कंपनीच्या ३७ बँक खात्यांत असलेली ११ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कमही ईडीने जप्त केली. यापूर्वी मे महिन्यातही कंपनीशी संबंधित ३६ ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. त्यापैकी एक छापा हा सध्या अटकेत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी निगडित मालमत्तेवर टाकण्यात आला होता.  शुक्रवारच्या कारवाईनंतर आतापर्यंत ईडीने कंपनीची एकूण ३६ कोटी ५८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.कंपनी समूहाकडून रेल्वेची फसवणूक 

  • अन्य घटनेत भारतीय रेल्वेमार्फत आपल्या मालाची वाहतूक करताना चुकीची माहिती देत सरकारी खजिन्याचे ७३ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालस्थित रश्मी ग्रूप ऑफ कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले. 
  • कंपनीशी संबंधित तीन ठिकाणी छापे टाकत ईडीने कंपनीच्या बँक खात्यात असलेली ६४ कोटी ९७ लाख रुपयांची रक्कम जप्त केली. 
  • कंपनीच्या कार्यालयातून एक कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. सिमेंट आणि धातू क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने रेल्वेद्वारे माल वाहतूक करताना चुकीची माहिती दिली. 
  • ज्या मालाकरिता रेल्वेतर्फे कमी  शुल्क आकारले जाते, अशा मालश्रेणीत आपल्या मालाची नोंद कंपनीने केली. वास्तविक कंपनीच्या मालासाठी त्यापेक्षा अधिक दर आकारणी लागू होती. 
  • अशा पद्धतीने रेल्वेची फसवणूक करत कंपनीने सरकारी महसुलाचे ७३ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयrailwayरेल्वेMONEYपैसा