शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कॅन्सरविरोधातील लढाईत ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होणार 1000 जैन साध्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 07:31 IST

२२० साध्वींनी स्क्रीनिंग करून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदाबाद : कॅन्सर विरोधातील लढाईमध्ये जैन समाजाने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी १००० जैन साध्वी ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होणार आहेत. धर्मगुरु व विविध जैन संघ, अहमदाबादच्या सहकाऱ्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. अहमदाबादेत २२० साध्वींच्या स्क्रीनिंगमध्ये चार चाचण्यांत ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आढळली आहेत. शहरातील १००० साध्वी स्क्रीनिंग करणार आहेत. आंबावाडी जैन संघ, अहमदाबादपासून स्क्रीनिंगची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचे प्रणेते बहुचर्चित कॅन्सर सर्जन डॉ. मुकेश बावीशी आहेत. त्यांनी आजवर १२ जैन साध्वींची ब्रेस्ट सर्जरी केलेली आहे.

डॉ. बावीशी यांनी १७० जैन संघाची प्रमुख संस्था जैन महासंघाचे प्रमुख प्रवीणभाई शाह यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनी परवानगी दिली. डॉ. बावीशी यांचे म्हणणे आहे की, देशात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्यामुळे हे महत्त्वाचे आहे. अविवाहित, निसंतान किंवा बाळांना स्तनपान न करणाऱ्या महिलांना याचा जास्त धोका आहे. त्यासाठी याची वेळोवेळी तपासणी गरजेची आहे. 

असा आला विचार, पतीनेही दिली साथही मोहीम सुरू करण्यात डॉ. मुकेश यांच्या पत्नी डॉ. विदुला बावीशी यांची महत्त्वाची भूमिका आहे. डॉ. विदुला सांगतात की, माझ्या माहितीतील साध्वीजींचे या आजाराने झुंजत असताना निधन झाले. तेव्हाच मी ठरवले की, एकाही साध्वीजी महाराजांना याचा त्रास होता कामा नये, यासाठी काही तरी केले पाहिजे. जुलै महिन्यात माझ्या पतीच्या सहकाऱ्याने संपूर्ण गुजरातमध्ये जैन साध्वीजी महाराजांसाठी विशेष स्क्रीनिंग मेमोग्राफी टेस्ट सुरू केली. रोटरी क्लब ऑफ अहमदाबाद मॅजेस्टी, एवरोन हॉस्पिटल, एआयएमएस हॉस्पिटल व निरामई संस्थानच्या संयुक्त उपक्रम व विविध जैन संघाच्या मदतीने संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जाईल. 

प्रवचनातूनही करू शकतात जागरूकताश्रीमद् विजय राजयशसूरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, रोगनिदान करणे धर्माविरुद्ध नाही. सामान्यत: जैन साधू महाराज किंवा साध्वीजी कधीही तपासणी करीत नाहीत. त्यांच्या प्रमुख गुरुवर्यांच्या आदेशानंतरच ते तपासणीसाठी तयार होतात. आंबावाडी जैन संघात ३९ साध्वीजी महाराजांच्या स्क्रीनिंगदरम्यान एक साध्वीजी महाराजांमध्ये या आजाराचे लक्षण आढळले. सर्वसामान्यांपर्यंत या धोकादायक आजाराची माहिती पोहोचावी, या उद्देशाने साध्वीजी महाराजांनी परवानगी घेऊन प्रवचनद्वारे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

बॅचचे सहकारी डॉक्टरही सहयोग देणारडॉ. बावीशी यांनी सांगितले की, आतापर्यंत २२० साध्वींची अत्याधुनिक थर्मो मेमोग्राफी कॅमेरातून स्क्रीनिंग करण्यात आली. यातून भविष्यात आकार घेणाऱ्या / विकसित होणाऱ्या गाठीचे चिन्ह पाहिले जाऊ शकते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या बॅचच्या महिला रोगतज्ज्ञ डॉक्टर राज्यातील विविध भागांमध्ये सेवा देत आहेत. राज्यात पुढील वर्षीच्या जूनपर्यंत २००० पेक्षा जास्त साध्वींची परवानगी घेऊन स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटल