100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:01 PM2019-03-28T12:01:24+5:302019-03-28T12:02:02+5:30

भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली.

100 scientists, 2 year preparations; Insight Story of India's Mission 'Shakti' | 100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

Next

नवी दिल्ली -  भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्यामिशन शक्तीच्या यशाची चर्चा जगभरात सुरू आहे. दरम्यान, मिशन शक्तीची पूर्वतयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती, गेल्या सहा महिन्यांपासून या मोहिमेच्या मिशन मोडवर काम सुरू होते. या मोहिमेच्या यशासाठी सुमारे 100 शास्त्रज्ञ काम करत होते, अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी दिली आहे. 

एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीआरडीओच्या प्रमुखांनी मिशन शक्तीविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ''मिशन शक्तीच्या यशासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 100 शास्त्रज्ञ सातत्याने काम करत होते. तसेच या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेने वाटचाल करत होते. या मोहिमेची इत्यंभूत माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत होती. तसेच डोवाल ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत होते.''





''या मोहिमेसाठी खूप आधीच सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान आम्ही आमच्या लक्ष्याला कायनेटिक किल म्हणजेच थेट उपग्रहालाच लक्ष्य केले. यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली. विशेष बाब म्हणजे या मोहिमेसाठी वापरण्यात आलेले सर्व तंत्रज्ञात हे भारतातच विकसित करण्यात आलेले होते. ते संपूर्ण पणे यशस्वी झाले.'' असेही डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी पुढे सांगितले. 

''A-SAT हे क्षेपणास्त्र लो अर्थ ऑर्बिट मध्ये संचार करणाऱ्या LEO उपग्रहांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. आमच्याकडे यापेक्षा मोठे लक्ष्य भेदण्याचीसुद्ध क्षमता आहे. मात्र कुठल्याही देशाचे नुकसान करण्याची आमची इच्छा नसल्याने आम्ही सुरुवातील LEO लाच लक्ष्य करण्याचे ठरवले.''असेही रेड्डी यांनी पुढे स्पष्ट केले. 



 

दरम्यान, अंतराळात संचार करणाऱ्या उपग्रहांना लक्ष्य करण्याचे तंत्र विकसित करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतरचा तिसरा देश ठरला आहे. जेव्हा चीनने अशा प्रकारची चाचणी घेतली होती. तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध नोंदवला होता. मात्र भारताने केलेल्या या चाचणीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने फारसा विरोध केलेला नाही.   



 

Web Title: 100 scientists, 2 year preparations; Insight Story of India's Mission 'Shakti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.