महाराष्ट्रातून अथर्व तांबट चमकला; जेईई मेन परीक्षेत ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 08:47 AM2021-09-16T08:47:42+5:302021-09-16T08:49:50+5:30

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत तर १८ जणांना फर्स्ट रँक मिळाला आहे.

100 percent of 44 students in JEE Main exam pdc | महाराष्ट्रातून अथर्व तांबट चमकला; जेईई मेन परीक्षेत ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के

महाराष्ट्रातून अथर्व तांबट चमकला; जेईई मेन परीक्षेत ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत तर १८ जणांना फर्स्ट रँक मिळाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर  jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर निकाल पाहता येईल. 

प्रथम रँकमध्ये जे १८ विद्यार्थी आहेत, त्यात अथर्व अभिजित तांबट (महाराष्ट्र), गौरब दास (कर्नाटक), वैभव विशाल (बिहार), दुग्गीनेनी व्यंकटा पनीश (आंध्र प्रदेश), सिद्धार्थ मुखर्जी (राजस्थान), रुचिर बन्सल (दिल्ली), अमैया सिंघल (उत्तर प्रदेश), मृदुल अगरवाल (राजस्थान), कोम्मा शरन्या, जोस्युला व्यंकटा आदित्य (तेलंगणा), काव्या चोप्रा (दिल्ली), पासला वीरा सिवा (आंध्र प्रदेश), कांचनपल्ली राहुल नायडू, कर्नाम लोकेश (आंध्र प्रदेश), पुलकित गोयल (पंजाब), पल अगरवाल (उत्तर प्रदेश), गुरमरीत सिंग (चंदीगड), अंशुल वर्मा (राजस्थान) यांचा समावेश आहे.   

जेईई ॲडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबरला

जेईई ॲडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेतील टॉप २.५ लाख रँक प्राप्त विद्यार्थीच देशातील प्रतिष्ठित २३ आयआयटीत प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जेईई ॲडव्हान्ससाठी रजिस्ट्रेशन करु शकणार आहेत. यंदा जेईई ॲडव्हान्स परीक्षा आयआयटी, खडगपूर आयोजित करणार आहे. जेईई मेन्समध्ये उत्तीर्ण विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी  jeeadv.ac.in च्या माध्यमातून रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करु शकतात.
 

Read in English

Web Title: 100 percent of 44 students in JEE Main exam pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.