शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात 100 नवजात बालकांचा मृत्यू, राजकारण तापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:51 IST

राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात झालेल्या 100 बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे.

कोटा - राजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये 9 अजून मुलांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 100 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान या बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या मुद्द्यावरून राजस्थान सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'एका महिन्यात 100 मुलांचा मृत्यू  होणे ही प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करण्याइतपत सामान्य बाब नाही, असा संताप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. तर बीएसपी प्रमुख मायावती यांनीही बालमृत्यूवरून गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली आहे.  दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये सुद्धा या रुग्णालयात 77 मुलांचा मृत्यू झाला होता. असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. ''30 डिसेंबर रोजी रुग्णालयात 4 मुलांचा मृत्यू झाला होता. तर 31 डिसेंबर रोजी 5 मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचा मृत्यू कमी वजनामुळे झाला आहे.''असे या रुग्णालयाचे सुपिरिटेंडेंट डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले. मुलांचा मृत्यूनंतर भाजपाने गहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुथ अमित मालवीय यांनीही या प्रकारावरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. एका महिन्यात 100 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना कुणी साधा प्रश्नही विचारत नाही. कोटा हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी येऊ शकत नाहीत एवढ्या दूर नाही. तसेच ही घटना एवढी किरकोळ नाही मात्र काँग्रेस सरकारच्या बेफिकिरीकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका मालविय यांनी केली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा