10 years three boys raped with six years minor girl in raipur | विकृतीचा कळस! शाळेच्या शौचालयात 6 वर्षांच्या मुलीवर 10 वर्षांच्या दोन मुलांकडून बलात्कार
विकृतीचा कळस! शाळेच्या शौचालयात 6 वर्षांच्या मुलीवर 10 वर्षांच्या दोन मुलांकडून बलात्कार

रायपूरः छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. एका सहा वर्षांच्या मुलीवर दोन 10 वर्षांच्या मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही नोंदवला गेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रायपूरच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलींसोबत पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी दुष्कृत्य केलं असून, तीन अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ती 6 वर्षांच्या विद्यार्थिनी 20 तारखेला शाळेत गेली होती. त्याच वेळी तिला पाचवी इयत्तेतील दोन विद्यार्थी शौचालयात घेऊन गेले. तर तिसरा विद्यार्थी हा शौचालयाबाहेर उभा होता. शौचालयात त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना 6 वर्षांच्या चिमुकलीबरोबर दुष्कृत्य केलं. हा सगळा प्रकार एका शिक्षिकेनं पाहिल्यानंतर ती आरोपी विद्यार्थ्यांवर ओरडली आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, तर त्या 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापकांकडे ती शिक्षिका घेऊन गेली. जेव्हा त्या चिमुकलीनं झालेल्या घटनेची माहिती स्वतःच्या पालकांना दिली, त्यावेळी पालकांनी पोलिसांत त्या अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. जेव्हा शाळा प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळाली, त्याच वेळी त्यांनी त्या आरोपी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई का केली नाही. तसेच पीडितेच्या पालकांना आरोपी विद्यार्थ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. तरीही शाळा प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही, तेव्हा मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्या अल्पवयीन मुलांवर कलम 2012अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विद्यार्थ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 


Web Title: 10 years three boys raped with six years minor girl in raipur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.