बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षामुंबई: डॉक्टर असल्याचे भासवत मुल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेवर बलात्कार करणार्या भांडूप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ही घटना २००५ मध्ये घडली़ तेथील एका महिलेला मुल होत नसल्याने तिला शेखकडे उपचार घेण्याचा सल्ला एका नातलगाने दिला़ त्यावेळी शेखने आपण ...
बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा
बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षामुंबई: डॉक्टर असल्याचे भासवत मुल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेवर बलात्कार करणार्या भांडूप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ही घटना २००५ मध्ये घडली़ तेथील एका महिलेला मुल होत नसल्याने तिला शेखकडे उपचार घेण्याचा सल्ला एका नातलगाने दिला़ त्यावेळी शेखने आपण डॉक्टर असल्याचा गाजावाजा भांडूपमध्ये केला होता़ प्रत्यक्षा तो एका रूग्णालयात सफाईचे काम करायचा़ पीडित महिला उपचारासाठी आल्यावर तो तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करायचा़ याचे त्याने मोबाईलमध्ये चित्रणही केले होते़ ही बाब महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तिला मोबाईलमधील चित्रण दाखवून ही बाब कोणालाही सांगू नकोस, धमकावले़ याचा फायदा घेत त्याने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला़ अखेर तो या महिलेला त्याच्या मित्रांसोबत जाण्यासाठी भाग पाडत होता़ त्यामुळे त्या महिलेने हा प्रकार पतीला संागितला़ त्यानुसार पतीने याचा गुन्हा नांेदवला़ त्यावेळी शेख डॉक्टर नसल्याचेही स्पष्ट झाले़याचा खटला विशेष न्यायालयात चालला़ पीडित महिला विवाहीत असल्याने शेखने याचा गैर फायदा घेतला़ त्यामुळे शेखला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील कल्पना हिरे यांनी न्यायालयाकडे केली़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने शेखला दहा वर्षांची शिक्षा व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला़ दंडाची रक्कम महिलेला द्यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे़