इम्फाळ : प्रीपाक (आरए) या प्रतिबंधित संघटनेच्या १० दहशतवाद्यांना मणिपूरमधील तेंगनौपाल जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेनजीक सुरक्षा दलांनी अटक केली. त्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मोरेह पोलिस ठाण्याच्या हद्दीत सीमेवर असलेल्या पिलर ७७ ते ८२ या दरम्यानच्या भागात या दहा जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
ओडिशातील शेवटचा आणि सर्वांत मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी सुक्रू हा मंगळवारी कंधमाल जिल्ह्यात पोलिसांसमोर चार साथीदारांसह शरण आला. सीपीआय (माओवादी)चा राज्य समिती सदस्य असलेला सुक्रूवर ५५ लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याने एके-४७ रायफलसह आत्मसमर्पण केले, तसेच त्याच्या साथीदारांनीही चार शस्त्रे जमा केली. मलकानगिरी जिल्ह्यातील रहिवासी असलेला ४९ वर्षीय सुक्रू हा राज्यातील उरलेल्या प्रमुख नक्षल नेत्यांपैकी एक मानला जात होता. तो १३ जणांच्या गटाचे नेतृत्व करत होता.
----००००----
Web Summary : Manipur police arrested 10 militants, including minors, near the Myanmar border. In Odisha, wanted Naxalite Sukru surrendered with associates and weapons; Sukru carried a ₹55 lakh reward.
Web Summary : मणिपुर पुलिस ने म्यांमार सीमा के पास नाबालिगों सहित 10 आतंकवादियों को गिरफ्तार किया। ओडिशा में, वांछित नक्सली सुक्रू ने साथियों और हथियारों के साथ आत्मसमर्पण किया; सुक्रू पर ₹55 लाख का इनाम था।