शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर १० कोटी रुपयांच्या नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 4:41 AM

लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या काळात बराच काळा पैसा बाहेर निघण्यास सुरुवात होते.

हैदराबाद : लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या काळात बराच काळा पैसा बाहेर निघण्यास सुरुवात होते. हा पैसा कोठून येतो, कोणाकोणाला आणि कशा पद्धतीने दिला जातो, याच्या बातम्या येत असतात. आताही तेलंगणात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तब्बल १0 कोटी रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.ही सारी रक्कम बेहिशेबी आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील पिप्परवाडा टोलनाक्याजवळ कार अडवून तिची तपासणी केली असता, त्यात १0 कोटी रुपये आढळले, अशी माहिती आदिलाबादचे पोलीस अधीक्षक नरसिंह रेड्डी यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहने तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.ही कार टोलनाक्याजवळ अडवली असता आतमध्ये पाच बॅगा दिसून आल्या. त्या उघडल्या, तेव्हा त्यात ५00 आणि २000 रुपयांच्या नोटा असल्याचे दिसून आले. या सर्व नोटा कोठून आल्या, कोणी दिल्या, त्याची काही कागदपत्रे आहेत का, असे प्रश्न पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या दोन जणांना केले; पण त्यांना त्याची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. >कारमधील दोघेही नागपूरचेआम्ही व्यापारी आहोत आणि आम्ही कर्नाटकातील एका गावी निघालो आहोत, असे उत्तर कारमधील दोघांनी दिले. आपण नागपूरमधील असल्याचेही दोघांनी पोलिसांना सांगितले. या प्रकाराची माहिती पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला दिली.