Jammu-Kashmir : कुपवाड्यात एका दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 10:54 IST2018-07-09T10:48:06+5:302018-07-09T10:54:34+5:30

जम्मू काश्मीरमधील कुपवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

1 terrorist killed in encounter in handwara jammu kashmir | Jammu-Kashmir : कुपवाड्यात एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu-Kashmir : कुपवाड्यात एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुपवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. कुपवाड्यातील हंडवाडा येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला. हंडवाड्यात दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे तातडीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्याने गोळीबार केला, त्याला सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले. यामध्ये हा दहशतवादी मारला गेला. 


8 जुलै 2016 रोजी भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान घातले होते. या घटनेला रविवारी दोन वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनानं काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
 

Web Title: 1 terrorist killed in encounter in handwara jammu kashmir