शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची मदत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 09:30 IST

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना थोडाशा आर्थिक मदतीने धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना थोडाशा आर्थिक मदतीने धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे

भोपाळ - देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे रुग्णालयातील धावपळ आणि नातेवाईकांना रुग्णावरील उपचारासाठी करावा लागणारा मनस्ताप हाही चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी होत आहे. तरीही अनेक रुग्ण दगावत आहेत. आता, मध्य प्रदेश सरकारने पीडित कुटुंबाला मदत देण्याचं जाहीर केलं आहे. 

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना थोडाशा आर्थिक मदतीने धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.  मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री उशिरा भाजपाच्या आमदारांसोबत बैठक घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्या घरावर कोरोनाचं संकट कोसळलं आहे, त्यांना केवळ शाब्दीक आधार देऊन चालणार नाही. या कुटुंबातील कोरोनाबाधितांना वाचविण्याचा आपण खूप प्रयत्न केला. पण, त्यात अपयश आले. त्यामुळे, या कुटुंबीयांस आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले. 

मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार पेन्शन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात येईल. या मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांच्या कुटूंबियांना मोफत रेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबे मोडली आहेत, तर काहीनी आपल्या म्हातारपणाची काठी गमावली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या कुटुंबांना सरकारकडून दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू