०७... काटोल ... गळ
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:04+5:302015-03-08T00:31:04+5:30
(फोटो)

०७... काटोल ... गळ
(फ ोटो)काटोलस्थानिक गळपुऱ्यातील धूलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या गळयात्रेला ९३ वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत जिल्ह्यातील विविध ठिकाणचे भाविक सहभागी होतात.धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पूजा करण्यात आली. गळपुरा येथे रहिवासी जगन माधवराव धवड यांना गळपुऱ्यातील ५२ फूट उंच लोखंडी खांबावरील गळाला बांधण्यात येते. त्यांना पाच फेऱ्या सरळ आणि पाच फेऱ्या उलट फिरविले जाते. यालाच गळी लागणे असे संंबोधले जात असूून, या चौकाला गळामुळेच गळपुरा असे नाव प्रचलित झाले. स्व. माधवराव विठोबा धवड हे त्यांच्या २५ व्या वर्षी येथे गळी लागले होते. तेव्हापासून ही परंपरा आजही कायम आहे. १९८७ पासून त्यांचे पुत्र जगन धवड हे गळी लागतात. त्यांना सलग दोन दिवस उपवास असतो. जगन व त्यांच्या पत्नीला या ठिकाणी आणले जाते. सतीच्या मंदिराजवळ एक खांब रोवलेला आहे. त्या खांबाच्या वरच्या टोकाला आडवा दांडा बांधलेला आहे. या दांड्याला गळी लागणाऱ्या व्यक्तीला बांधले जाते. त्याचे तोंड जमिनीकडे व पाठ आकाशाकडे असते. या यात्रेत वरुड, मध्य प्रदेशातील पांढुर्णा, सावनेर यासह अन्य ठिकाणचे भाविक सहभागी होतात. त्यामुळे काटोल-जलालखेडा व काटोल-सावरगाव या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविली जाते. (तालुका प्रतिनिधी)---