पारिजातनगर येथील युुवकाचा मोबाइल खेचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:38 IST2019-03-17T00:37:35+5:302019-03-17T00:38:35+5:30
महात्मानगर भागातील पारिजातनगरच्या गार्डनजवळून रस्त्याने पायी चालताना मोबाइलवर बोलणाऱ्या युवकाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वारांनी पळविल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) घडली.

पारिजातनगर येथील युुवकाचा मोबाइल खेचला
नाशिक : महात्मानगर भागातील पारिजातनगरच्या गार्डनजवळून रस्त्याने पायी चालताना मोबाइलवर बोलणाऱ्या युवकाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वारांनी पळविल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारिजातनगरमधील मुक्ती अपार्टमेंटमधील राहणार विकासकुमार श्रीप्रयाग साव (२९ ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विकासकुमार साव शुक्रवारी कॉलेजरोडने पारिजातनगरकडे पायी जात असताना गार्डनजवळ पाठीमागून ‘एमएच १५ डीटी ७०८१’ या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला.
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक साबळे करीत आहेत.