युवकांनो खेळातून उंच भरारी घ्या : वि. वि.करमरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:33 IST2017-12-22T22:42:37+5:302017-12-23T00:33:48+5:30

युवकांनो खेळातून उंच भरारी घ्या : वि. वि.करमरकर
सायखेडा : के.के.वाघ शैक्षणकि संस्थेने क्रि डा स्पर्धाचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाङूना संधी उपलब्ध करून दिली आहे.तरी युवकांनी या संधीचे लाभ उठवावा व आपले कौशल्य पणाला लावून खेळात उंच भरारी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रि डा समालोचकवि. वि.करमरकर यांनी चांदोरी येथील के.के.वाघ महाविद्यालयात केले. चांदोरी येथील के.के.वाघ महाविद्यालयात,के.के.वाघ शिक्षण संस्था,स्माईल व स्पिनॅच नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉलीबॉल व खो खो स्पर्धांचे उदघाटन करमरकर व निफाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी दीपक गिर्हे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. त्यावेळी करमरकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. यावेळी व्यासपीठावर अजिंक्य वाघ, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, चांदोरीचे उपसरपंच बापू गझख, दिलिप कदम, खंडू बोङके आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष वाघ यांनी प्रस्ताविकात स्पर्धेसंदर्भात भूमिका विशद केली. यावेळी निफाङ,सिन्नर ,दिंझेरी, चांदवङ येथील खेळाङू तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थित होते.