क्रेनच्या अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:55 IST2019-04-14T13:54:04+5:302019-04-14T13:55:26+5:30

दिंडोरी : तालुक्यातील तळेगाव दिंडोरी शिवारातील फ्लायोक्रिट्स कंपनीत क्रेनचा अपघात होऊन मडकीजांब येथील कामगार युवकाचा मृत्यू झाला आहे.

Youth's death in crane accident | क्रेनच्या अपघातात युवकाचा मृत्यू

क्रेनच्या अपघातात युवकाचा मृत्यू

दिंडोरी : तालुक्यातील तळेगाव दिंडोरी शिवारातील फ्लायोक्रि ट्स कंपनीत क्रेनचा अपघात होऊन मडकीजांब येथील कामगार युवकाचा मृत्यू झाला आहे. तळेगाव दिंडोरी इंदोरे रस्त्यावर एक सिमेंट ब्लॉक बनविणारी फ्लायोक्रि ट्स कंपनी असून तेथे विशाल भारत बोराडे (२३) हा कामगार काम करत असताना क्र ेनचा अपघात होऊन त्यात तो अडकून जबर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दिंडोरी रु ग्णालयात नेण्यात आले. परंतु तो रस्त्यातच गतप्राण झाला. घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी दिंडोरी रु ग्णालयात गर्दी केली. त्याच्यावर मंडकीजाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहे. 

Web Title: Youth's death in crane accident

टॅग्स :Nashikनाशिक