पेठरोडला युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:36 IST2019-11-11T01:34:56+5:302019-11-11T01:36:26+5:30

पेठरोड येथील लक्ष्मणनगर परिसरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

Youth suicide in Pethrod | पेठरोडला युवकाची आत्महत्या

पेठरोडला युवकाची आत्महत्या

पंचवटी : पेठरोड येथील लक्ष्मणनगर परिसरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिकेत संजय गायकवाड आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे.
अनिकेत गायकवाड हा कुटुंबीयांसमवेत राहत होता. त्याने शनिवारी (दि.९) राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याने त्याची प्रकृती बिघडली. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ उपचारार्थ जिल्हा रु ग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. अनिकेतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Youth suicide in Pethrod