कोरोनाच्या भीतीमुळे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:35 IST2020-04-11T22:42:58+5:302020-04-12T00:35:20+5:30

नाशिकरोड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघड झाला.

 Youth suicide because of Corona's fears | कोरोनाच्या भीतीमुळे युवकाची आत्महत्या

कोरोनाच्या भीतीमुळे युवकाची आत्महत्या

नाशिकरोड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघड झाला.
नाशिकरोड भागातील हा युवक प्लम्बिंगचे काम करतो. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने सुसाइड नोट लिहिली असून, त्यात मला कोरोना झाला आहे. पोलिसांना कळवावे असे नमूद केले आहे. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्यावी, असेही त्याने नमूद केले आहे. या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. तथापि, सदरचा युवक निगराणीखाली नव्हता किंवा त्याचे कोणत्याही प्रकारे नमुनेदेखील घेण्यात आले नव्हते. त्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतरच उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परीवार आहे. त्याचा भाऊ दिल्ली येथे असतो. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याला आपल्याला कोरोना झाल्याचे वाटत होते. त्यातून एका स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू केले होते. मात्र, त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते.

Web Title:  Youth suicide because of Corona's fears

टॅग्स :Nashikनाशिक