पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणारा युवक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 01:40 IST2022-07-14T01:39:56+5:302022-07-14T01:40:17+5:30

मालेगाव शहरालगतच्या गिरणा नदीला पूर पाणी आला असताना त्याकडे दुर्लक्ष व गिरणा पुलावर स्टंटबाजी करीत नदीपात्रात उडी मारणाऱ्या नईम मोहम्मद अमीन (वय २३, रा. किल्ला) याचा मालेगाव अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात आहे.

Youth stuntman disappears in flood waters | पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणारा युवक बेपत्ता

पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणारा युवक बेपत्ता

मालेगाव : शहरालगतच्या गिरणा नदीला पूर पाणी आला असताना त्याकडे दुर्लक्ष व गिरणा पुलावर स्टंटबाजी करीत नदीपात्रात उडी मारणाऱ्या नईम मोहम्मद अमीन (वय २३, रा. किल्ला) याचा मालेगाव अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात आहे. बुधवारी (दि. १३) सायंकाळी गिरणा पुलावर त्याने पाण्यात उडी घेतली. त्याचा अद्याप शोध लागला नाही. अनेक तासांपासून यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. गेल्या २३ मे रोजी त्याचे लग्न झाले आहे. तो मित्रांसोबत फिरायला आल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

Web Title: Youth stuntman disappears in flood waters