शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सोशल मीडियाच्या आभासी जगात अडकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:51 PM

सायखेडा : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंटस‌्, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत.

ठळक मुद्देधक्कादायक : लाईक्‍स, कमेंट्‌स अन्‌ स्टेटसचा खेळ ठरतोय जीवघेणा

सायखेडा : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंटस‌्, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत.साधारणत: तीन बाय सहा इंचच्या मोबाईल डिस्प्लेवर अख्खे विश्‍व, संपर्क व माहितीचे जाळे आता सहज उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे क्रांती झाली असली तरी हल्ली बहुसंख्य त्यातच आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. ही बाब मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या मोबाईल वापरकर्ते रुग्णांच्या संख्येवरुन दिसुन येते. बहुतांश युजर्संचा सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल दिसतो. ज्या वयात सकारात्मक विचारांच्या पेरणीची गरज असते. त्या वयात नकारात्मक भावना, चिंता वाढून सहनशिलता क्षीण होण्याची भिती सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे वाढते. युजर्सने एखादी पोस्ट टाकली तर त्यावर सोशल मीडियात कमेंट, लाईक्‍स याला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी. इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे ही धडपड तरुणाईत आहे.त्यासाठी सोशल मीडियाचा शॉर्टकट घेतले जात आहेत. परंतु कमी लाईक्‍स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त मिळाल्या तर त्याच विश्‍वात गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपण, निराशा असे परिणाम वाढत असून, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात.असेही एक जगत्याची व तिची फेसबुकवर ओळख झाली. नंतर संपर्क वाढला. प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ती स्वप्नात जगत होती. ती त्याचाच विचार करीत होती. तिच्याशी त्याने शरीरसंबंधही प्रस्थापित केले; परंतु प्रत्यक्षात मात्र तिला ऐनवेळी दगाफटका दिला आणि तिचे स्वप्न उद्‌वस्त केले. फेसलेस चॅट आणि आभासी जीवन जगण्यामुळे ही वेळ अनेकांवर येत आहे.टीक टॉक असो वा इंन्स्ट्राग्राम की फेसबुक या सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली तरुणाई विविध व्हिडीओ, सेल्फी अपलोड करीत आहेत. धोक्‍याच्या स्थळी जाऊन जीव आणखीनच धोक्‍यात घालून व्हिडिओ कॉलिंग, स्टंट करण्याकडे कल वाढला आहे. व्हिडिओ चित्रण करून अपलोड ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त प्रसिद्ध होऊ अशी भावनाही युजर्संची आहे. या आभासी जगातही काहीजणांचे जीव गेल्याची उदाहरणे आहेत. तरुणांने प्रसिद्धी साठी असे स्टंट करू नये.- आशिष अडसूळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायखेडा.र्व्हच्युअल लाईफपेक्षा सोशल लाईफ जगण्याची गरज आहे. स्वमग्न नव्हे अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. तरुणांनी मोबाईल मधील गेम्स खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावे, यामुळे तरुणाचा चिडचिडेपणा दूर होते. त्याच बरोबर शरीर मजबूत होते.- शंकर सांगळे, कब्बड्डी प्रशिक्षक, निफाड.काय म्हणतात तज्ज्ञमाणसांचा माणसांशी प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. परिणामी, व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढत आहे. सोशल मीडियात वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्‍स, कमेंट, व्ह्युव्हज या गोष्टी महत्वाच्या वाटु लागल्या आहेत. आनंद म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी असाच समज वाढत आहे. त्यातून व्यक्ती स्वत:च स्वत:चे आभासी विश्‍व तयार करुन त्यात रममान होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्यक्तींचे सातत्य राखण्याची क्षमता व सहनशिलता कमी होत जाते.- डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल, चांदोरी. 

टॅग्स :Mobileमोबाइलonlineऑनलाइन