शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून युवकाची हत्त्या

By admin | Updated: February 28, 2015 23:49 IST

संशयितास अटक : विंचूरगवळी येथील घटना

पंचवटी : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकास लोखंडी गजाने बेदम मारहाण करून तिघांनी खून केल्याची घटना उघडकीस आली़ आडगाव शिवारातील नवजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर घडलेल्या या घटनेत मृत युवकाचे नाव राजू लिंबाजी हिंगोले (३०, रा़ खातोळे, जि़ हिंगोली) आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शाळेच्या वॉचमनला ताब्यात घेण्यात आले आहे़राजू हिंगोले व नवजीवन शाळेचा वॉचमन बाळू खिल्लारे या दोघांचेही हिंगोली येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते़ दोन-तीन दिवसांपूर्वी संशयित खिल्लारे याने सदर महिला व हिंगोले या दोघांनाही फोन करून नाशिकला बोलावले़ त्यानुसार हे दोघेही आडगाव शिवारातील नवजीवन पब्लिक स्कूलमध्ये वॉचमनचे काम करणाऱ्या बाळू खिल्लारेच्या घरी आले़ या ठिकाणी पाहुणचार झाल्यानंतर शुक्रवारी रात्री खिल्लारे व हिंगोले हे बाहेर फिरून येतो, असे सांगून घराबाहेर पडले़ त्यानंतर या दोघांमध्ये या महिलेवरून वाद झाले व या वादाचे पर्यावसन बेदम हाणामारीत झाले़ संशयित खिल्लारे व त्याच्या साथीदारांनी हिंगोले यास शाळेच्या मैदानावर लोखंडी गजाने बेदम मारहाण केली़ त्यामध्ये डोके, हात-पायास गंभीर मार लागल्याने तो रक्तबंबाळ होऊन शाळेच्या मैदानावर पडला़ यानंतर संशयितांनी घरी येऊन हिंगोले मृत झाल्याचे सांगितले असता, सदर महिलेने त्याचा शोध घेतला असता तो रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले़ तिने काही शिक्षकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी राजू हिंगोलेचा मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार, हवालदार सुरेश गवळी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ तसेच महिलेकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.दरम्यान, या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात संशयित बाळू ऊर्फ कैलास विश्वनाथ खिल्लारे, प्रदीप ज्ञानबा खिल्लारे (दोघेही रा. खातोळे, जि. हिंगोली) व गजानन कुऱ्हाडे या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी बाळू खिल्लारे यास ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर)