कंटेनरच्या धडकेने युवक ठार, अपघातानंतर नागरिकांचा महामार्गावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:59 IST2018-09-27T12:59:07+5:302018-09-27T12:59:24+5:30

आझादनगर : मालेगाव - माळधे शिवरस्त्यावरील इस्कॉट नाका येथे सकाळी सव्वा नऊ वाजता कन्टेनरने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस ठोस दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Youth killed by containers, people stabbed on the highway after the accident | कंटेनरच्या धडकेने युवक ठार, अपघातानंतर नागरिकांचा महामार्गावर ठिय्या

कंटेनरच्या धडकेने युवक ठार, अपघातानंतर नागरिकांचा महामार्गावर ठिय्या

आझादनगर : मालेगाव - माळधे शिवरस्त्यावरील इस्कॉट नाका येथे सकाळी सव्वा नऊ वाजता कन्टेनरने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस ठोस दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर घटनेमुळे परिसरात नागरिकांनी काही काळ महामार्गावर ठिय्या दिला. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. पोलिसांनी जमावास पिटाळून लावत वाहतुक सुरळीत केली. सकाळी नऊ वाजता अल्ताफ अहमद अन्सार अहमद (१८) रा महेवी नगर हा माळधे शिवारात आपल्या यंत्रमाग कारखान्यातून येत असतांना रस्ता ओलांडत असताना मनमाड चौफुली कडून धुळेच्या दिशेने जाणाºया कन्टेनरने (एमएच ४६ ए. आर. ६५६५) हिरो स्प्लेंडर (एमएच ४१-जे. ८०७) ही चाकाखाली आल्याने दुचाकीचा चक्काचूर होवुन अल्ताफ अहमद जागीच ठार झाला. घटनेमुळे नागरिकांनी घटनास्थळी दगड लावून रस्ता बंद करीत संताप व्यक्त केला. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप चोपडे, तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी दंगा नियंत्रण पथकाच्या सहाय्याने जमावास पांगवित वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Youth killed by containers, people stabbed on the highway after the accident

टॅग्स :Nashikनाशिक