माळेगाव एमआयडीसीत अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:18 IST2018-02-11T00:17:50+5:302018-02-11T00:18:06+5:30
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील साईबाबानगरमधील युवक ठार झाला.

माळेगाव एमआयडीसीत अपघातात युवक ठार
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील साईबाबानगरमधील युवक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. महेश भाऊसाहेब घुले (२५) हा युवक पॅशन-प्रो मोटारसायकलने (क्र. एमएच १५ ईआर ०१९५) जिंदाल फाटा ते वारणा कंपनी या रस्त्याने जात असताना मॅझिमो टेम्पोने (एमएच १५ सीके ९२०५) हॉटेल नीलेशजवळ समोरून धडक दिली. या अपघातात महेश घुले याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीलाल वसावे अधिक तपास करीत आहेत.