कुंभाळेनजिक गुजरातच्या युवकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:30 IST2021-02-16T20:21:54+5:302021-02-17T00:30:42+5:30

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ व कुंभाळे नजिक मोहाचापाडा शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गुजरात राज्यातील युवक चिरडला गेल्याने जागीच ठार झाला.

The youth of Gujarat was crushed near Kumbhale | कुंभाळेनजिक गुजरातच्या युवकाला चिरडले

कुंभाळेनजिक गुजरातच्या युवकाला चिरडले

ठळक मुद्दे महामार्ग : अज्ञात वाहनाने दिली धडक

याबाबत पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भदरपाडा ( गुजरात) येथील दोन युवक दुचाकी (क्र. जीजे १५- एएन २४०५) वर गहूची पोते घेऊन जात असतांना मोहाचापाडा शिवारात तोल गेल्याने विलासभाई गोविंदभाई फौदार (२६,रा. भदरपाडा) हा रस्त्यावर फेकला गेला. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विलासभाई जागीच ठार झाला. याबाबत जगनभाई पांडूभाई गांगोडा ( रा. विजय पाडा, गुजरात ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप वसावे, हवालदार व्ही.एस. डंबाळे, दिलीप रेहरे करीत आहेत.

Web Title: The youth of Gujarat was crushed near Kumbhale