लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे युवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:35 IST2018-08-28T00:35:24+5:302018-08-28T00:35:50+5:30

लोकलढा सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आदिवासी युवा महोत्सव पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 Youth Festival by Lok Dalha cultural movement | लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे युवा महोत्सव

लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे युवा महोत्सव

नाशिक : लोकलढा सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आदिवासी युवा महोत्सव पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोपाळ गवारी, नगरसेवक सुरेश खेताडे, मुख्याध्यापक मंगला शिंदे, चंदर ढोले, विश्वास वाघमारे, समाधान घोडेस्वार, संगीता विचारे, नंदिनी भालेराव, प्रदीप बडगे, विष्णू गुमाडे, राजेंद्र गाडगे आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या संयोजक जयश्री ढोले यांनी महोत्सवाची माहिती दिली. प्रास्ताविक संजय पंचरस यांनी केले. कार्यक्रमास संजय साळुंके, किशोर शिरसाठ, किशोर तायडे आदी उपस्थित होते.
निबंध, वक्तृत्व स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक
निबंध स्पर्धेत अनेक युवकांनी सहभाग नोंदविला. त्यात प्रथम क्रमांक परमेश्वरी भैरव, द्वितीय अमोल झनकर, तृतीय माधुरी मालट यांनी पारितोषिक मिळविले. तर वक्तृत्व स्पर्धेत प्रत२ीक्षा मोरे, आशिष दाहिया, मंजुळा चौधरी, नामदेव टोकरे, हेमंत चौधरी यांनी यश मिळविले. यावेळी महेंद्र जाधव, संदीप गवारी, सुवर्णा जोपळे आदी उपस्थित होते.

Web Title:  Youth Festival by Lok Dalha cultural movement

टॅग्स :Nashikनाशिक