शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:55 IST2021-09-07T20:55:09+5:302021-09-07T20:55:31+5:30
त्र्यंबकेश्वर : रविवारी एकीकडे पोळा साजरा होत असताना दुसरीकडे स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात माशांना खाद्य खाऊ घालत असताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने नयन जगन्नाथ दाते (२१) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती त्र्यंबक पोलिसांनी सांगितली.

मळ्यात भाजीपाला व अन्य पिकांसाठी स्वतःच्या मालकीचे शेततळे केले असून तलावात सोडलेल्या माशांना खाद्य खाऊ घालत असताना नयन जगन्नाथ दाते याचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. ही माहिती तळेगाव (अं.) चे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नामदेव दाते यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिली. यावरून त्र्यंबक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय खैरनार करीत आहेत.