दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:39 IST2021-03-23T22:24:01+5:302021-03-24T00:39:13+5:30
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील नागझरी वस्तीवर राहणाऱ्या संदीप गायकवाड (२६) याचा दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

संदीप गायकवाड
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील नागझरी वस्तीवर राहणाऱ्या संदीप गायकवाड (२६) याचा दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातातमृत्यू झाला.
येथील पेंटिंग व्यावसायिक आदिवासी तरुण संदीप गायकवाड हा तरसाळी येथून काम आटोपून सोमवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घराकडे मोटरसायकलने येत असताना कंधाणे फाट्याजवळ अचानक रस्त्यावर दुसरी भरधाव मोटरसायकल आडवी आल्याने संदीपचा तोल जाऊन तो खाली पडला व त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
जखमी अवस्थेत त्याला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पेंटर व्यवसायात हस्तकलेमुळे तो आदिवासी बांधवांमध्ये शेमळी परिसरात प्रसिद्ध होता. तीन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी असा परिवार आहे. जुनी शेमळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड यांचे ते लहान बंधू होत.