कारवाडी येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 01:59 IST2022-03-11T01:59:30+5:302022-03-11T01:59:49+5:30
सिन्नर तालुक्यातील कारवाडी येथे विजेचा धक्का लागून २७ वर्षीय युवा इंजिनिअरच्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.

कारवाडी येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील कारवाडी येथे विजेचा धक्का लागून २७ वर्षीय युवा इंजिनिअरच्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
कारवाडी येथील पंकज विजय जाधव हा युवा इंजिनिअर पुण्यातील एका कंपनीत नोकरीला होता. वर्क फ्रॉम होममुळे तो गेल्या काही दिवसापासून कारवाडी येथील आपल्या घरातूनच कंपनीचे काम पाहत होता. गुरुवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बटण बंद करत असताना विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.