गांधी अटकेच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसचे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:59 IST2019-07-20T18:57:46+5:302019-07-20T18:59:11+5:30
कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ

गांधी अटकेच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसचे रास्तारोको
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने केलेली अटक व दलित आणि आदिवासी नागरिकांवर होणाऱ्या हल्यांच्या निषेधार्थ नाशिक युवक काँग्रेसच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येवून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ तसेच देशात होत असलेल्या दलित आणि आदिवासींवर अन्यायाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील व प्रदेश युवक सरचिटणीस नयना गावित यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी कार्र्यकर्त्यांनी शालीमार चौकात तीव्र निदर्शने केली तसेच रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाच्या फिती लावून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात माणिक जायभावे, धनंजय कोठुळे, सलमान काझी आकाश घोलप, आण्णा मोरे, दिलीप मुळाने, जावेद पठाण, रमेश देवगिरे, सूरज चव्हाण, कुणाल गांगुर्डे, आनंद जना, प्रथमेश शितोळे, फारूख काद्री आदी उपस्थित होते.