गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 00:45 IST2021-12-29T00:44:50+5:302021-12-29T00:45:09+5:30
सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील ३६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नवनाथ सुकदेव सांगळे (३६) असे मृत युवकाचे नाव आहे.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच येथील ३६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नवनाथ सुकदेव सांगळे (३६) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याने राहत्या घराच्या समोर मंडपाच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहायाने गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक वाजे अधिक तपास करीत आहेत.