नगरसूल येथे युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:27 IST2020-09-06T23:48:14+5:302020-09-07T00:27:02+5:30
नगरसूल : येथील आदिवासी चौफुली वस्तीवरील सतीश संजय ठाकरे (२५) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आली.

नगरसूल येथे युवकाची आत्महत्या
ठळक मुद्देसतीश त्याची पत्नी व दीड वर्षाचा लहान मुलगा शनिवारी रात्री घरात झोपले होते.
नगरसूल : येथील आदिवासी चौफुली वस्तीवरील सतीश संजय ठाकरे (२५) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आली.
सतीश त्याची पत्नी व दीड वर्षाचा लहान मुलगा शनिवारी रात्री घरात झोपले होते. मात्र पहाटे सतीशच्या पत्नीला जाग आली तेव्हा सतीशने घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने आरडाओरड करून आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांना माहिती दिली. रहिवाशांनी तत्काळ दोरी काढून सतीशला रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नगरसूल पोलिसांनी घटनेची नोंद केली.