तुसाच्या काळ्या राखेमुळे वाढते प्रतिकारशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:26 IST2020-06-16T21:32:50+5:302020-06-17T00:26:40+5:30
नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तुसाच्या काळ्या राखेमुळे वाढते प्रतिकारशक्ती
नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
चारसूत्री भातलागवड पद्धतीच्या पहिल्या टप्प्यात तूस व पेंढा यातील सिलिकॉन व पालाश अन्नद्रव्याचा फेरवापर करतात. यात भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी गादी रोपवाफ्यात प्रत्येक चौरस मीटरला अर्धा ते एक किलो एका गुंठ्याला ७० ते १०० किलो या प्रमाणात ४ ते १० से.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे, असे ते म्हणाले.
तुसाच्या काळसर राखेत जवळ जवळ ३० ते ३५ टक्के सिलिकॉन असते. तुसाच्या राखेमुळे भाताच्या रोपांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. रोप निरोगी व कणखर होतात. खोडकिड व पानावरील करपा रोगास पीक प्रतिकार करू शकते. यामुळे भाताचे व पेंढ्यांचे उत्पादन वाढते. काळ्या राखेबरोबरच भाताचा न भिजलेला पेंढा नांगरणीच्या वेळी चिखलणी अगोदर हेक्टरी दोन टन या प्रमाणात शेतात पसरावा, नंतर भातखाचरात नांगरठीने गाडावा. त्यामुळे हेक्टरी सुमारे २० ते ३० किलो पालाश व ६० ते ११० किलो सिलिकॉन पुरवठा होऊ शकतो. पालाश हा अन्नघटक पिकात कीड व रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते. अन्नद्रव्याच्या पुरवठ्या सोबतच सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले.
---------------
गिरिपुष्प वनस्पती बहुवार्षिक
दुसºया टप्प्यात गिरिपुष्प या झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे. गिरिपुष्पाचा हेक्टरी २० ते ३० क्विंटल म्हणजे हेक्टरी तीन टन हिरवा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा. त्यापासून हेक्टरी १२ ते १५ किलो नत्र पिकाला उपलब्ध होते. याबरोबरच गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब राहतात. जमीन सुपीक व टिकाऊ होते. गिरिपुष्प ही वनस्पती बहुवार्षिक आहे. दरवर्षी झाडे लावण्याची गरज नसते, असे माजी कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी म्हटले आहे.