बजरंगवाडी येथे युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 01:09 IST2019-02-11T01:07:46+5:302019-02-11T01:09:25+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

Younger's bloody murder at Bajrangwadi | बजरंगवाडी येथे युवकाचा निर्घृण खून

बजरंगवाडी येथे युवकाचा निर्घृण खून

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी येथे सराईत गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
गजानन दीपक गावित (३२, रा. बजरंगवाडी) असे मयताचे नाव आहे. गावित याच्यावर विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून सदर हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ११ वाजेच्या सुमारास एका हॉटेलजवळ गावित हा बसलेला होता. त्यावेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गावितवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तो जागीच मरण पावला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, मुंबई नाका, उपनगर तीनही पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
खूनसत्र सुरूच
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून, दोन दिवसांपूर्वीच सिडको येथे अशाच प्रकारे भोसकून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेने नाशिकमध्ये महिनाभरात तब्बल सहा खून झाले आहेत.

Web Title: Younger's bloody murder at Bajrangwadi