तरु णांनी केला वानराचा दशक्रि या विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:01 IST2020-04-20T00:01:07+5:302020-04-20T00:01:22+5:30
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला.

तरु णांनी केला वानराचा दशक्रि या विधी
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला.
हनुमान जयंतीच्या दिवशी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. रस्ता ओलांडत असतना अज्ञात वाहनाची धडक लागून त्यातील एक वानर ठार झाले होते. या वानराचा मृतदेह गावात आणून गावकऱ्यांनी हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत दफन विधी केला.
वानराचा दशक्रिया विधी करण्याचे काही तरुणांनी ठरवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन मोजकेच तरुण या विधीसाठी उपस्थित होते. यावेळी जमावबंदी आदेशाचे पालनही करण्यात आले. दशक्रि या विधीसाठी वावी पोलीस स्टेशनकडून परवानगी घेतल्याची माहिती उपसरपंच सुखदेव गुंजाळ यांनी दिली.
योगेश घुमरे, दत्तू गुंजाळ, दत्ता चतुर, विलास डोंगरे, अनिल बैरागी, अमोल घोलप, भीमाजी पवार, दत्तू चिने यांनी सहकार्य केले. काही तरुणांनी विधिवत पूजन करून मुंडणही केले. गणेश पाटील यांनी पौरोहित्य केले. या वानराचे मंदिर बांधण्याचे गावकऱ्यांनी ठरविले आहे.
हनुमान जयंतीला वानरांचा समूह गावात आल्याने प्रत्यक्ष हनुमंताने दर्शन दिले अशी ग्रामस्थांची भावना झाली. त्यामुळे गावातील काही तरु णांनी या वानराचा दशक्रि या विधी करण्याचे ठरवले. त्यानुसार मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत रविवारी (दि.१९) विधिवत पूजन करून वानराचा दशक्रि या विधी पार पडला.