विंचूरला तरुणांनी श्रमदानातून बुजवले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:27 IST2019-09-02T14:26:59+5:302019-09-02T14:27:31+5:30
विंचूर: डोंगरगाव रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने येथील वसाहतीतील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अखेर तरु णांनी पुढाकार घेत स्वखर्चाने श्रमदानातून खड्डे बुजवत आदर्श घालून दिला आहे.

विंचूरला तरुणांनी श्रमदानातून बुजवले खड्डे
विंचूर: डोंगरगाव रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने येथील वसाहतीतील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अखेर तरु णांनी पुढाकार घेत स्वखर्चाने श्रमदानातून खड्डे बुजवत आदर्श घालून दिला आहे.
येथील गजराज फाउंडेशनच्यावतीने विंचुर येथील डोंगरगांवरोडचे श्रमदानातुन खड्डे बुजवले. फाउंडेशनचे अध्यक्ष विकी कासव, उपाध्यक्ष संग्राम थोरात, रोहित चौधरी, अदित्यराज दरेकर, अक्षय थोरात, गिरीष ढवण, साहील पठाण, आवेश शाह, गोकुळ त्र्यंबके, आदेश खरे , प्रशांत वझरे, ओंकार थोरात यांनी श्रमदानातून रस्त्याचे काम केले. यासाठी लागणारे जेसीबी व ट्रॅक्टर योगेश खुळे यांनी उपलब्ध करून दिले.