पळाशीजवळ अपघातात तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 01:04 IST2020-12-23T22:31:43+5:302020-12-24T01:04:06+5:30
नांदगाव : नांदगाव-मनमाड रोडवर हिसवळ बुद्रुक गावाजवळ तेल टँकर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात पळाशी, ता. नांदगाव येथील धनंजय कैलास भारे (२२) हा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला, तर इतर दोन तरुण जखमी झाले.

पळाशीजवळ अपघातात तरुण जागीच ठार
ठळक मुद्देपंधरा दिवसांपासून टँकर व कंटेनर अपघात होऊन मृत्यू पावलेली ही तिसरी घटना
नांदगाव : नांदगाव-मनमाड रोडवर हिसवळ बुद्रुक गावाजवळ तेल टँकर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात पळाशी, ता. नांदगाव येथील धनंजय कैलास भारे (२२) हा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला, तर इतर दोन तरुण जखमी झाले. त्यांची नावे समजली नाहीत. मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून टँकर व कंटेनर अपघात होऊन मृत्यू पावलेली ही तिसरी घटना आहे.