खंबाळेत तरूणावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:46 IST2020-02-04T14:41:01+5:302020-02-04T14:46:13+5:30

सिन्नर : मित्रांमध्ये भांडण का लावले? म्हणून विचारण्यास गेलेल्या युवकाच्या छातीजवळ कात्रीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना गेल्या तालुक्यातील खंबाळे येथे घडली.

 The young man was hit with scissors in a blanket | खंबाळेत तरूणावर वार

खंबाळेत तरूणावर वार

सिन्नर : मित्रांमध्ये भांडण का लावले? म्हणून विचारण्यास गेलेल्या युवकाच्या छातीजवळ कात्रीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना गेल्या तालुक्यातील खंबाळे येथे घडली. गावातीलच सलूनच्या दुकानात हा प्रकार घडला. कृष्णा बाळासाहेब आंधळे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सुनील शिंदे याचेकडे माझी चहाडी का केली, असे कृष्णाने विचारल्यावर अनिष जगदीश सिंग याने त्याची कॉलर पकडली. दोघांमध्ये झटापट सुरू असताना अनिष याने दुकानातील तुटलेली कात्री हातात घेऊन कृष्णाच्याछाती जवळ खुपसून जखमी केले. कृष्णा याने वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रविण अढांगळे तपास करीत आहे.

Web Title:  The young man was hit with scissors in a blanket

टॅग्स :Nashikनाशिक