पोलीस अकादमीत तरुणाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 01:21 IST2020-12-17T01:20:35+5:302020-12-17T01:21:34+5:30

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पाेलीस अकादमीमधील एका महिला सफाई कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाने अकादमीच्या आवारातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) दुपारी उघडकीस आली.

Young man strangled at police academy | पोलीस अकादमीत तरुणाने घेतला गळफास

पोलीस अकादमीत तरुणाने घेतला गळफास

नाशिक : त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पाेलीस अकादमीमधील एका महिला सफाई कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाने अकादमीच्या आवारातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राहुल दिलबाग दुलगज (१९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. राहुल हा आपल्या आईसोबत मागील काही वर्षांपासून अकादमीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासात राहात होता. नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास त्याची आई अकादमीच्या आवारातील स्वच्छता करण्यासाठी बाहेर गेल्या असता, राहुलने त्याच्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. राहुलच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Web Title: Young man strangled at police academy