पुरात अडकलेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:15 IST2019-08-10T01:15:32+5:302019-08-10T01:15:52+5:30
सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

पुरात अडकलेल्या तरुणाचा मृत्यू
नाशिक : सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
बादल शंकर मेहतर (वय ३२ रा. सायखेडा, ता.निफाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या रविवारी (दि. ४) निफाड तालुक्यातील चांदोरी - सायखेडा या गावांना गोदावरीच्या पुराने वेढा दिला होता. यावेळी बादल मेहतर हा मद्यधुंद तरुण चांदोरी बसथांबा परिसरातील पूरपाण्याच्या फुगवट्यात अडकल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब रेस्क्यू पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यास सुखरूप काढण्यात यश आले होते. या घटनेनंतर त्याची प्रकृती खालावली होती. गुरुवारी (दि. ८) त्यास अशक्तपणा जाणवू लागल्याने भाऊ सूरज मेहतर यांनी त्यास रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.